मुंबईत आलेले मराठा आंदोलक सांगतात, 'हॉटेल बंद केले, पाणी संपलं, पण...'

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईत आलेले मराठा आंदोलक सांगतात, 'हॉटेल बंद केले, पाणी संपलं, पण...'
मुंबईत आलेले मराठा आंदोलक सांगतात, 'हॉटेल बंद केले, पाणी संपलं, पण...'

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज (30 ऑगस्ट) दुसरा दिवस आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदान परिसर आंदोलकांनी भरुन गेला आहे.

मुंबईत कालपासून पाऊस सुरू असून यामुळे मैदान परिसरात चिखल झाला आहे, तरी आंदोलकांची उपस्थिती कायम आहे.

काल मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांनी पावसामुळे मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. अनेकांनी गैरसोयीबाबत नाराजी व्यक्त केली.

रिपोर्ट - अल्पेश करकरे

एडिट - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)