जगभरात अधिक मुलं लठ्ठपणाकडे झुकत आहेत असं UNICEF का सांगतंय?
जगभरात अधिक मुलं लठ्ठपणाकडे झुकत आहेत असं UNICEF का सांगतंय?
जगात पहिल्यांदाच कमी वजन असलेल्या मुलांपेक्षावजन जास्त असलेल्या, लठ्ठपणा असलेल्या मुलांची संख्या जास्त झाल्याचं आढळलंय.
जगभरातल्या 5 -19 वर्ष वयोगटातल्या दर 5 मुलांपैकी एकाचं वजन जास्त आहे... आणि संपूर्ण जगामध्ये 39.1 कोटी मुलं जास्त वजन असणारी आहेत, तर दर 10 पैकी 1 अशा दराने 18.8 कोटी मुलांना लठ्ठपणा आहे, असं Unicef म्हणजेच United Nations Children's Fund ने केलेल्या अभ्यासात समोर आलंय.
काय सांगतंय हे संशोधन? लहान मुलांचं असं वजन वाढण्यामागे काय कारणं आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले






