गर्भाशय काढण्यासाठी महिलेने खोटं आधार कार्ड का बनवलं? - बीडमधून ग्राऊंड रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, गर्भाशय काढण्यासाठी महिलेने खोटं आधार कार्ड का बनवलं?
गर्भाशय काढण्यासाठी महिलेने खोटं आधार कार्ड का बनवलं? - बीडमधून ग्राऊंड रिपोर्ट

भारतात गरज नसताना गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांवर (hysterectomy) सरकारच्या गाईडलाईन्स आहेत. बीडमध्ये ऊसतोड मजूर महिलांमध्ये कमी वयात गर्भाशय काढण्याचं प्रमाण इतर कोणत्याही भागापेक्षा जास्त आहे.

नुकतंच बीड प्रशासनाने शस्त्रक्रियांचं प्रमाण कमी झाल्याचा दावा केला. या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बनावट आधारकार्ड तयार करून त्यावर वय वाढवलं आणि शस्त्रक्रियेची परवानगी मिळवली हे एका महिलेचं उदाहरण प्रातिनिधिक आहे. ते तितकंच सद्यस्थितीवर प्रकाश टाकतं.

महिलांना कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय, याविषयीचा हा ग्राऊंड रिपोर्ट

  • रिपोर्ट- प्राजक्ता धुळप
  • शूट- नितीन नगरकर
  • व्हीडिओ एडिट - शरद बढे