अर्थसंकल्पाकडून ग्रामीण भागातील लोकांना काय अपेक्षा आहेत?
अर्थसंकल्पाकडून ग्रामीण भागातील लोकांना काय अपेक्षा आहेत?
नजर जाईल तिथवर इथे शेतं दिसतात, पण देशाच्या इतर भागांसारखी आर्थिक भरभराटीची चमक इथे दिसत नाही. सुशील पाल यांचं कुटुंब पिढ्यानपिढ्या इथे शेती करतंय. यात मेहनत खूप आहे, पण परतावा तितका नाही असं ते सांगतात.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला मत दिलेल्या सुशीलनी यावेळी निर्णय बदलला. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं मोदींचं आश्वासन नुसतं आश्वासनच राहिल्याचं ते सांगतात.
या भागात भाजपची निवडणुकीत पिछेहाट होण्याचं एक कारण ही आर्थिक विवंचना सुद्धा आहे.
स्थानिकांना नोकऱ्या आणि मागणीला चालना देऊ शकेल अशा उत्पादनाला बळ देणं हे आर्थिक विषमता दूर करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
रिपोर्ट - निखिल इनामदार
बीबीसी प्रतिनिधी






