सुशीला साबळे : क्लायमेट रेफ्युजी, कचरावेचक ते आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्ष
सुशीला साबळे : क्लायमेट रेफ्युजी, कचरावेचक ते आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्ष
आपल्या घरातला कचरा तापमान वाढीत भर घालतो, हे शास्त्रीय पद्धतीने आकडेवारीसह प्रसिद्ध झालेलं आहे. त्यानुसार कचरावेचकांची भूमिका महत्त्वाची ठरते.
वर्ल्ड बँक, युएनडीपी, युएनइपी यांच्यासारख्या मातब्बर संस्थांनीही क्लायमेट चेंजचा सामना करण्यात त्यांचं योगदान अधोरेखित केलं आहे.
इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वेस्ट पिकर्स या कचरावेचकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने नुकतीच आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस निवडून आणली. त्यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षपदी मुंबईच्या सुशीला साबळे यांची निवड झाली.
त्या स्वतः क्लायमेट रेफ्युजी (हवामान संकटाचा फटका बसल्याने निर्वासित) आहेत.
- रिपोर्ट - प्राजक्ता धुळप
- शूट - शरद बढे, प्राजक्ता धुळप
- व्हीडिओ एडिट - शरद बढे






