हुंड्यासाठी सासरच्यांनी जाळल्याचा आरोप, नोएडाचं निक्की हत्या प्रकरण नेमकं काय?

व्हीडिओ कॅप्शन, हुंड्यासाठी सासरच्यांनी जाळलं? नॉयडाचं निक्की प्रकरण नेमकं काय?
हुंड्यासाठी सासरच्यांनी जाळल्याचा आरोप, नोएडाचं निक्की हत्या प्रकरण नेमकं काय?

21 ऑगस्टला दिल्लीजवळील ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात निक्कीचा आगीत जळून मृत्यू झाला. पण तिच्या मृत्यूसाठी सासरचे जबाबदार असल्याचे आरोप झाले, आणि त्यासोबतच एक व्हीडिओ व्हायरल झाला ज्यात निक्कीसोबत हिंसाचाराचा होताना दिसतोय.

निक्कीला आधी भाजलेल्या अवस्थेत एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मग तिथून तिला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलला रेफर करण्यात आलं, आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी निक्कीच्या नवऱ्यासह सासू सासरे आणि नवऱ्याचे मोठे भाऊ, या सगळ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पाहा नेमकं प्रकरण काय?

  • रिपोर्ट - चंदन जजवाडे आणि देवाशिष कुमार