भारताचा खरा GDP काय? IMF ने सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्यांना C ग्रेड का दिला?

व्हीडिओ कॅप्शन, भारताचा खरा GDP काय? IMF ने सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्यांना C ग्रेड का दिला?
भारताचा खरा GDP काय? IMF ने सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्यांना C ग्रेड का दिला?

भारताचा 'रिअल GDP' 2025-26 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 8.2 टक्के वाढला आहे, असं भारत सरकारनं अलीकडेच म्हटलं आहे.

ही वाढ गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 5.6 टक्क्यांपेक्षा खूपच जास्त आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्यांच्या अलीकडच्या अहवालात भारताच्या GDP आणि त्याच्या आकडेवारीच्या गुणवत्तेला 'C' रेटिंग दिले आहे.

त्यामुळे GDPचे आकडे विकासाकडे वाटचाल दाखवत असताना IMFने C रेटिंग का दिले, अशी चर्चा या रेटिंगनंतर सुरू झाली आहे.

विश्लेषण - टीम बीबीसी

निवेदन - अभिजीत कांबळे

एडिटिंग - निलेश भोसले

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.