कासवांची अंडी विकणारं वेळास गाव कसं झालं रोल मॉडेल?

व्हीडिओ कॅप्शन, पूर्वी कासवाची अंडी विकणाऱ्या लोकांनी वेळासला कासवाचं गाव ही ओळख कशी मिळवून दिली?
कासवांची अंडी विकणारं वेळास गाव कसं झालं रोल मॉडेल?

ओलीव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संवर्धनाचं काम वेळासमध्ये दोन दशकांपासून अविरतपणे सुरू आहे. वेळास हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातलं किनाऱ्यालगतचं गाव.

या गावामुळे आज कोकण किनारपट्टीवरील अनेक गावांमध्ये कासव मित्र तयार झाले आहेत. कासवांच्या संवर्धनासोबतच इथे पर्यटनही वाढल्याने लोकांना रोजगार उपलब्ध झालाय. वेळासचा दोन दशकांचा प्रवास थक्क करणारा आहे.

रिपोर्ट- मुश्ताक खान

शूट- नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- शरद बढे

प्रोड्युसर- प्राजक्ता धुळप