मराठवाड्यातल्या पतसंस्थांमध्ये हजारो कोटींचा घोटाळा कसा झाला?
गुंतवलेल्या रक्कमेवर अधिक परतावा मिळेल या आशेने महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील लोकांनी पतसंस्थामध्ये आपल्या ठेवी ठेवल्या. पण पतसंस्थामधील कोट्यावधीच्या घोटाळ्यांनी त्यांची आयुष्यातली मोठी कमाई वेठीस धरली गेली.
आदर्श सहकारी पतसंस्था, ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, जिजाऊ मांसाहेब मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थामधील ठेवीदारांना त्याचा फटका बसला आहे.
गेल्या दोन वर्षांत हे घोटाळे समोर आले. तेही लोकांनी ऑडिटची मागणी केल्यावर.
“हे घोटाळे कोट्यवधी रुपयांचे आहेत आणि अनेक गुंतवणूकदारावर त्याचा परिणाम झाला आहे. या प्रश्नाची दखल घेण्यासाठी लवकरच दिल्लीत विशेष बैठक बोलावण्यात येईल, असं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलं.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला पण त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही. ती मिळाल्यास इथं अपडेट करण्यात येईल.
- रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
- शूट – किरण साकळे
- व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर





