जैसलमेरमध्ये धावत्या बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, जैसलमेरमध्ये धावत्या बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा मृत्यू
जैसलमेरमध्ये धावत्या बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा मृत्यू

राजस्थानमधल्या जैसलमेरहून जोधपूरला जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागल्याने 20 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 16 जण गंभीर जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 57 प्रवाशांना घेऊन जाणारी बस दुपारी 3 वाजता जैसलमेरहून निघाली. आणि सुमारे 10 मिनिटांनीच

जैसलमेर-जोधपूर महामार्गावर बसच्या मागून धूर निघू लागला. चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबवली, पण काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला.

स्थानिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी मदत आणि बचावाचा प्रयत्न केला, पण तोवर काही मृत्यू झाले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)