अफगाणिस्तानमधील तालिबानने पाकिस्तानी सीमा चौक्यांवर हल्ला का केला? जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर संघर्ष, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला
अफगाणिस्तानमधील तालिबानने पाकिस्तानी सीमा चौक्यांवर हल्ला का केला? जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं

11 ऑक्टोबरला रात्री उशिरा अफगाण तालिबानने पाकिस्तानी सीमा चौक्यांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर भीषण गोळीबार झाला. या आठवड्यात काबूलमध्ये झालेल्या स्फोटांनंतर ही घटना घडली.

तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या स्फोटांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरत एक निवेदन जारी केलं होतं त्यामध्ये पाकिस्तानी लष्कराला “परिणाम भोगावे लागतील” अशी चेतावणी दिलेली. मात्र पाकिस्तानकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.

रॉयटर्सच्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबरला रात्री सीमेवर अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, त्यांनी अफगाणिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)