नासाचे संशोधक एक वर्ष 'प्रति मंगळा'वर का राहिले?

व्हीडिओ कॅप्शन, नासाचे संशोधक एक वर्ष 'प्रति मंगळा'वर का राहिले?
नासाचे संशोधक एक वर्ष 'प्रति मंगळा'वर का राहिले?

मंगळावरच्या भविष्यातल्या कॉलनीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यासाठी मानवाला कोणती कौशल्यं शिकून घ्यावी लागतील, तिथपर्यंतचा मोठा प्रवास लोकांना कसा करता येईल आणि तिथल्या कठीण परिस्थितीत कसं राहता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नासाने एक प्रयोग केला.

अमेरिकेतल्या टेक्सास राज्यामध्ये ह्यूस्टनमधल्या नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये मंगळ ग्रहासारखंच वातावरण आणि भूभाग असणारी फॅसिलिटी - कृत्रिम मंगळ ग्रह तयार करण्यात आला आणि नासाचे 4 संशोधक तिथे वर्षभर राहिले.

या काळात या वैज्ञानिकांनी नक्की काय केलं?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - टीम बीबीसी

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - शरद बढे