डॉ. संग्राम पाटील यांना लंडनला जाण्यापूर्वी मुंबई एअरपोर्टवर का थांबवण्यात आलं?

व्हीडिओ कॅप्शन, डॉ. संग्राम पाटील यांना लंडनला जाण्यापूर्वी मुंबई एअरपोर्टवर का थांबवण्यात आलं?
डॉ. संग्राम पाटील यांना लंडनला जाण्यापूर्वी मुंबई एअरपोर्टवर का थांबवण्यात आलं?

डॉ. संग्राम पाटील यांना भारतातून लंडनला परत जाताना मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं. त्यांच्या नावावर काढण्यात आलेलं लुकआऊट सर्क्युलर अद्याप कायम असल्यानं त्यांना देश सोडून जाता येणार नाही, असं इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सांगितल्याचंही डॉ. पाटील यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

डॉ. संग्राम हे मूळचे जळगाव जिल्ह्याचे असून, ते आता युकेचे नागरिक आहेत.

पाहा हा व्हीडिओ.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)