विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला, जनजीवन विस्कळीत

व्हीडिओ कॅप्शन, विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला, जनजीवन विस्कळीत
विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला, जनजीवन विस्कळीत

पावसानं सोमवारी विदर्भात थैमान घातलं आहे. गडचिरोलीत झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीये. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय.

दुसऱ्या दिवशीही भामरागडमधील पूरस्थिती कायम असून जवळपास 50 पेक्षा अधिक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलंय.

बाजारपेठ पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे, तर अनेक घरांमध्येही पाणी शिरलंय. परिणामी शेती आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठी नासधूस झाली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)