महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. एक सप्टेंबरला मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं असून, काही भागांमध्ये अतिवृष्टीसदृश पाऊस झालाय.
संभाजीनगरच्या पाचोड परिसरात रविवारी (1 सप्टेंबर) रात्री झालेल्या पावसामुळे गल्हाटी नदीला पूर आला.
पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं पाचोड बुद्रुक आणि पाचोड खुर्द या दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता.






