पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता किती तारखेला मिळणार?

व्हीडिओ कॅप्शन, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता किती तारखेला मिळणार? या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांचा लाभ रोखण्यात आलाय?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता किती तारखेला मिळणार?

एम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलाय. 21 वा हप्ताही लवकर शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

या व्हीडिओत आपण 21 वा हप्ता कधी मिळणार आहे? तसंच गेल्या काही हप्त्यांपासून अनेक शेतकरी म्हणत आहेत की त्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता येणं बंद झालंय, त्यामागचं कारण काय आहे? या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत.

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-179.

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट – महेश सातपुते

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)