माओवाद संपवल्याचा दावा, पण प्रत्यक्षात काय आहे परिस्थिती?
भारतातला सशस्त्र माओवादी संघर्षाचा इतिहास जुना आहे. साठच्या दशकात पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी चळवळीला सुरूवात झाली, तेव्हापासून या आंदोलनाने अनेक चढउतार पाहिले आहेत.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये देशातील नऊ राज्यांतील अनेक भाग नक्षलवादी हिंसेच्या विळख्यात होते. यापैकी सर्वाधिक भाग छत्तीसगढमध्ये होते.
पण सरकारचा दावा आहे की, नक्षलवादाविरुद्धची त्यांची लढाई 31 मार्च 2026 पर्यंत संपुष्टात येईल. या दाव्याचे कारण सांगताना सरकार आपल्या धोरणांचा आणि नक्षलवाद्यांविरुद्धच्या सुरक्षा दलाच्या कारवाईबद्दल सांगते.
छत्तीसगढमध्ये ही कारवाई विशेषतः पोलिसांच्या एका संघटनेमार्फत केली जात आहे. त्याचे नाव आहे, डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड म्हणजेच डीआरजी.
राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार इतर सुरक्षा दलांच्या तुलनेत डीआरजीची भूमिका वेगळी आणि महत्त्वाची आहे. बीबीसी प्रतिनिधी जुगल पुरोहित आणि सिराज अली छत्तीसगढमधील परिस्थिती जवळून जाणून घेण्यासाठी डीआरजीच्या वेगवेगळ्या टीम्ससोबत राहिले, फिरले. एवढेच नाही तर त्यांनी तिथे राहणाऱ्या आदिवासींची परिस्थितीही समजून घेतली.
पाहा हा व्हीडिओ रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






