तो क्षण, जेव्हा LIVE बातम्या सुरू असतानाच चॅनेलच्या इमारतीवर रॉकेट हल्ला झाला

व्हीडिओ कॅप्शन, इराणमध्ये लाईव्ह बातम्या सुरू असतानाच टीव्ही चॅनेलवर इस्रायलनं हल्ला केला.
तो क्षण, जेव्हा LIVE बातम्या सुरू असतानाच चॅनेलच्या इमारतीवर रॉकेट हल्ला झाला

इस्रायलनं इराणच्या IRINN या सरकारी वृत्तवाहिनीवर हल्ला केला. इस्रायलचं रॉकेट चॅनेलच्या इमारतीवर आदळलं, तेव्हा एक निवेदक बातम्या देत होती.

स्फोटाचे आवाज आणि धुरळा उडाला, तेव्हा ती कॅमेऱ्यासमोरून दूर झाली. हल्ल्यानंतर काही मिनिटे चॅनेलचं प्रसारण बंद झालं, पण नंतर ते पुन्हा सुरू झाल्याची माहिती मिळते आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)