कल्याणची ही मुलगी रॅप साँगमधून सामाजिक विषयांवर भाष्य करते आहे

व्हीडिओ कॅप्शन, रॅप साँगमधून सामाजिक विषयांवर भाष्य करणारी माही जी
कल्याणची ही मुलगी रॅप साँगमधून सामाजिक विषयांवर भाष्य करते आहे

माही जी म्हणून ओळखली जाणारी कल्याणची मधुरा घाणे आदिवासी समाजातील आहे. आणि तिच्या रॅपमुळे सोशल मिडियावर चर्चेत असते.

सहसा बोललं जात नाही अशा विषयांवर रॅप केले आहेत, असं ती म्हणते. आपल्या समाजातील आदिवासींवरही मधुराने रॅप केलंय. या रॅपमुळेच मधुराला खरी ओळख मिळाली.

तिचं रॅप बॉलिवूड सेलिब्रिटी बादशाह आणि विशाल ददलानी यांनी शेअर केलं होतं.

  • रिपोर्ट, शूट आणि एडिट : राहुल रणसुभे