मेन्स्ट्रुअल कप अंतराळात पाठवून 'नासा'ने काय संशोधन केलं? - सोपी गोष्ट
मेन्स्ट्रुअल कप अंतराळात पाठवून 'नासा'ने काय संशोधन केलं? - सोपी गोष्ट
अमेरिकन अंतराळवीर सॅली राईड 1983 साली पहिल्यांदा अंतराळात गेल्या तेव्हा त्यांच्या आठवड्याभराच्या मिशनसाठी सोबत 100 टॅम्पॉन्स देण्याची चर्चा झाली होती.
आतापर्यंत एकूण 103 महिला अंतराळात गेल्या आहेत, पण अंतराळात असताना पाळी काही काळासाठी थांबवण्याचा पर्यायच बहुतेकदा वापरला जातो. पण भविष्यातल्या दीर्घकालीन मोहीमांसाठी असं करणं शक्य नसेल किंवा मग ज्या महिलांना अंतराळात असताना पाळी रोखायची नसेल, त्यांच्यासाठी काय पर्याय आहे.
म्हणूनच पहिल्यांदाच अंतराळामध्ये Menstrual Cup ची चाचणी घेण्यात आलीय.
काय होतं हे AstroCup Mission? आणि त्यातून काय निष्पन्न झालं?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
- रिपोर्ट : अमृता दुर्वे
- निवेदन : सिद्धनाथ गानू
- एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



