नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घालण्यावरून वाद
नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घालण्यावरून वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 मेला वाराणसीतून उमदेवारी अर्ज भरला, तेव्हा त्यांच्यासोबत भाजपप्रणित NDA आघाडीतले मोठे नेते आणि मुख्यमंत्री होते. यावेळी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हेसुदधा होते.
यावेळी प्रफुल्ल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर एक टोपी ठेवली, पण ही काही साधीसुधी टोपी नव्हती तर होता जिरेटोप जो नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पाहिला जातो. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांवर राज्यातल्या विरोधी पक्षांनी कडाडून टीका केली आहे.
पाहा नेमकं काय घडलं.






