गावाकडची गोष्ट : पीएम किसान योजनेच्या नावानं व्हायरल मेसेज आला तर सावधान!
गावाकडची गोष्ट : पीएम किसान योजनेच्या नावानं व्हायरल मेसेज आला तर सावधान!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचं नुकतंच वितरण करण्यात आलं.
देशातल्या 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींहून अधिकची रक्कम टाकण्यात आली.
पण, पीएम किसान योजनेसंदर्भात एक मेसेज सातत्यानं व्हॉट्सअपवर व्हायरल होत असतो. या मेसेजमधील फाईलवर किंवा लिंकवर क्लिक केल्यास तुमच्यासोबत धोका होऊ शकतो.
काय आहे हा मेसेज आणि त्यावर क्लिक केल्यास धोका कसा होऊ शकतो, पाहूया या व्हीडिओत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट -135
- लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
- कॅमेरा – किरण साकळे
- एडिट – राहुल रणसुभे



