मुलांचं स्थलांतर थांबवणारे कुडे सर, ज्यांच्यामुळे एका गावातली मुलं घडली

व्हीडिओ कॅप्शन, मुलांचं स्थलांतर थांबवणारे कुडे सर, ज्यांच्यामुळे एका गावातली मुलं घडली
मुलांचं स्थलांतर थांबवणारे कुडे सर, ज्यांच्यामुळे एका गावातली मुलं घडली
कुडे गुरूजी

शिकणाऱ्या मुलांच्या पाठीशी उभे राहणारे जगदीश कुडे सर. जवळपास 19 वर्षं जालन्याच्या श्रीराम तांडा परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलंय.

या गावातले 95 टक्के पालक उदरनिर्वाहाकरता उसतोडीसाठी जात होते. त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांचंही स्थलांतर व्हायचं.

हे स्थलांतर थांबवण्यासाठी कुडे सरांनी पालकांचं मन वळवलं आणि गावात बदल होऊ लागला. आज गावात 100 टक्के मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आहेत.

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे

शूट- अमोल लंगर

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)