मुंबईतून अपहरण झालेली चिमुरडी मराठीत बोलल्याने कशी सापडली?
मुंबईतून अपहरण झालेली चिमुरडी मराठीत बोलल्याने कशी सापडली?
20 मे 2025 ला मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरून एका चार वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं होतं. वाराणसीतून पोलिसांनी या मुलीला शोधून काढलं.
बरोबर सहा महिन्यांपूर्वी 20 मे 2025 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरून एका चार वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं होतं.
ही मुलगी सहा महिन्यांनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या वारणसी इथं सापडली. पण हे जवळपास 180 दिवस या लहान मुलीच्या आई-वडिलांची झोप उडवणारे ठरले.
मुंबई पोलिसांनीही पाठपुरावा सोडला नाही आणि मुंबईपासून तब्बल 1500 किलोमीटरवर असलेल्या वारणसीतून या चिमुकलीला शोधून काढलं.
या सहा महिन्यांत नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी 'ऑपरेशन शोध' कसं राबवलं? जाणून घेऊया.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






