साडेतीन हजार वृद्धांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करणाऱ्या योजना घरत

व्हीडिओ कॅप्शन, साडेतीन हजार वृद्धांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करणाऱ्या योजना घरत यांची गोष्ट
साडेतीन हजार वृद्धांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करणाऱ्या योजना घरत

योजना घरत या गेल्या 30 वर्षांपासून वृद्धांसाठी काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल 3500 वृद्धांना दत्तक घेतलं आहे. योजना यांनी 1993 मध्ये पालघरच्या बोईसर इथे वृद्धांसाठी काम करायला सुरूवात केली. तिथे एका मंदिराच्या जागेवर त्या वृद्धाश्रम चालवायच्या.

मात्र नंतर मंदिराच्या बांधकामामुळे त्यांना जागा सोडावी लागली. त्यानंतर त्यांनी पनवेलला काम सुरू केलं. आता सध्या त्यांचा वृद्धाश्रम ठाणे जिल्ह्यातील काल्हेर येथे आहे. योजना यांच्या कामाला त्यांच्या सासरच्यांनी विरोध केला. मात्र 2012 ला पती आणि कुटुंबापासून वेगळ्या झाल्या.

आज योजना यांच्या दोन्ही मुली त्यांना वृद्धाश्रमाच्या कामात मदत करतात. आतापर्यंत 2000 हून जास्त लोकांवर अंत्यसंस्कार केल्याचं योजना सांगतात.

(रिपोर्ट, शूट आणि एडिटिंग - राहुल रणसुभे)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)