सुनीता विल्यम्स अंतराळातून व्हाईट हाऊसच्या दिवाळी उत्सवात कशा पोहोचल्या? पाहा व्हीडिओ
सुनीता विल्यम्स अंतराळातून व्हाईट हाऊसच्या दिवाळी उत्सवात कशा पोहोचल्या? पाहा व्हीडिओ
अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहत असतानाच दिवाळीचा सणही साजरा केला जातोय. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्येही दिवाळी साजरी झाली. यावेळी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सर्वांना शुभेच्छा देताना संदेश दिला.
यावेळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेल्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनीही सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीपेक्षा यंदा अमेरिकेत दिवाळी वेगळी आणि महत्त्वाची ठरतेय, कारण एका आठवड्यावर आलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकीकडे डोनाल्ड ट्रंप आहेत तर दुसरीकडे आहेत कमला हॅरिस, ज्या भारतीय वंशाच्या आहेत.






