माहीमच्या पालिका शाळेच्या जमिनीवरुन आंदोलन का सुरू आहे?

व्हीडिओ कॅप्शन, माहिमच्या पालिका शाळेच्या जमिनीवरुन आंदोलन का सुरू आहे?
माहीमच्या पालिका शाळेच्या जमिनीवरुन आंदोलन का सुरू आहे?

मुंबईत पालिका शाळांच्या जागांवरून आंदोलन पेटलं आहे. मोक्याच्या भूखंडांवर असलेल्या मराठी आणि प्रादेशिक भाषांच्या शाळा पाडल्या जात असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

तर अचानक विद्यार्थ्यांना लांबच्या शाळांत स्थलांतरित केल्याने पालकांची नाराजी आहे. माहीम, मोरी रोड, परळ, कुलाबा आणि इतर भागातील पालिका शाळांबाबत पालक, स्थानिक कार्यकर्ते आणि मराठी अभ्यास केंद्राने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेने आरोपांना उत्तरं देत या जागांवर शाळाच बांधण्यात येईल असं म्हटलं आहे.

रिपोर्ट- दीपाली जगताप

शूट- शाहीद शेख

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.