'लेडी गावस्कर' म्हटल्या जाणाऱ्या भारताच्या महिला क्रिकेटच्या पहिल्या ओपनिंग बॅटर शोभा पंडित यांचा प्रवास
'लेडी गावस्कर' म्हटल्या जाणाऱ्या भारताच्या महिला क्रिकेटच्या पहिल्या ओपनिंग बॅटर शोभा पंडित यांचा प्रवास
भारताच्या महिला क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या ओपनिंग बॅटर शोभा पंडित यांचा प्रवास संघर्षाचा होता.
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यावेळच्या अडचणी, पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅचेस, दुखापती, तुटलेली बॅट, परदेशातील संघर्ष, तिसऱ्या वर्गात प्रवास, आणि पहिल्या महिला टीमला मिळालेल्या मर्यादित सुविधा यावरले आपले अनुभव सांगितले. त्या 17 कसोटी सामने, 20 वनडे आणि एक वर्ल्ड कप खेळल्या होत्या. त्यांना ‘लेडी गावस्कर’ म्हटलं जायचं. इंडियन महिला क्रिकेटच्या संघर्षाच्या त्या साक्षीदार राहिल्या आहेत.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



