युद्ध कुणी थांबवलं? एकाच दिवसात दिल्ली ते अमेरिका, सगळेच बोलले
युद्ध कुणी थांबवलं? एकाच दिवसात दिल्ली ते अमेरिका, सगळेच बोलले
लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा सुरू असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षानंतर युद्ध कुणी थांबवलं, यावरूनही बरीच चर्चा झाली.
एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने दावा करत आहेत की हे युद्ध त्यांच्यामुळे थांबलं, मात्र दुसरीकडे मोदी सरकारने यावर स्पष्ट भाष्य केलेलं नाही.
अशात लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं की काय ते एकदाचं स्पष्ट करून टाका. पाहा त्यावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले. अर्थात, त्याच्या काही वेळाने लगेच अमेरिकेत ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा त्यांच्या श्रेयासाठी आग्रह केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






