अभिनेता अल्लू अर्जुनला आधी अटक, आता घरावर हल्ला

व्हीडिओ कॅप्शन, अल्लू अर्जुनला आधी अटक, आता घरावर हल्ला
अभिनेता अल्लू अर्जुनला आधी अटक, आता घरावर हल्ला

अल्लू अर्जुनच्या घरासमोर 22 डिसेंबरला काही तरुणांनी राडा घालून तोडफोड करायचा प्रयत्न केला. हे तरुण उस्मानिया युनिव्हर्सिटी जॉइंट ॲक्शन कमिटी (OU JAC) चे सदस्य होते, असं ANI वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

अल्लू अर्जुनने मृत महिलेच्या कुटुंबीयांना 25 लाखांच्या नुकसान भरपाईची घोषणा केली होती. मात्र ही नुकसानभरपाई एक कोटी करावी, अशी मागणी या तरुणांनी अल्लू अर्जुनकडे केली आहे.

त्यासाठीच या तरुणांनी रविवारी त्याच्या घरात आधी घुसण्याचा प्रयत्न केला, आणि नंतर घराबाहेर राडा घातला. घराच्या फाटकाजवळ असलेल्या कुंड्यांची या तरुणांनी नासधूस केली, ज्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहा नेमकं काय घडलं.