इस्रायल हिजबुल्लाह संघर्ष : लेबनॉनवर रात्री रॉकेट हल्ला, स्फोटानं बैरूत शहर हादरलं

व्हीडिओ कॅप्शन, लेबनॉनच्या बैरूत शहरात रात्री रॉकेट हल्ला, स्फोटानं शहर हादरलं | इस्रायल हिजबुल्लाह संघर्ष
इस्रायल हिजबुल्लाह संघर्ष : लेबनॉनवर रात्री रॉकेट हल्ला, स्फोटानं बैरूत शहर हादरलं

इस्रायलवर हमासच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे, पण आता इस्रायल आणि लेबनॉनमधल्या हिजबुल्लाह या संघटनेमधला संघर्ष पेटला आहे.

शनिवारी रात्री इस्रायलनं बैरूतवर तर हिजबुल्लाहनं उत्तर इस्रायलमध्ये क्षेपणास्त्रं डागली.

लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हल्ल्यानंतर आगीचे मोठे लोळ उठलेले दिसले.