पंतप्रधानांना पोलिसांनी ठोठावला दंड; सीट बेल्ट न लावल्याप्रकरणी कारवाई

फोटो स्रोत, RISHISUNAKMP/INSTAGRAM/PA WIRE
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी धावत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्याने त्यांना ब्रिटनच्या पोलिसांनी दंड ठोठावला आहे. ऋषी सुनक धावत्या कारमध्ये सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवत होते.
लँकेशायर पोलिसांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, ऋषी सुनक यांनी त्यांची चूक मान्य केली असून त्यांच्यावर फिक्स्ड पेनल्टी लावण्यात आलीय.
यावर पंतप्रधान ऋषी सुनक यांचं कार्यालय, 10 डाउनिंग स्ट्रीटने या संदर्भात एका निवेदन देत म्हटलंय की, "पंतप्रधानांनी एक व्हिडिओ शूट करण्यासाठी सीट बेल्ट काढला होता, ही चूक होती.
पंतप्रधानांनी आपली चूक मान्य केली असून त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. प्रत्येकाने सीट बेल्ट लावला पाहिजे, असं त्यांचंही मत आहे."
दरम्यान, ब्रिटनमध्ये जर एखाद्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला नाही तर त्याला 10,000 रुपयांचा दंड आकारला जातो. तसेच हे प्रकरण कोर्टात गेल्यास त्याला 50,000 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
ऋषी सुनक यांनी हा व्हिडिओ बनवला तेव्हा ते उत्तर इंग्लंडमधील लँकेशायरमध्ये होते.
या व्हिडीओच्या माध्यमातून ऋषी सुनक सांगत होते की, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी त्यांचं सरकार स्थानिक पातळीवर गुंतवणूक करून नवे रोजगार निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.

फोटो स्रोत, Reuters
दुसऱ्यांदा ठोठावला दंड
सुनक यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता.
सरकारमध्ये असताना ऋषी सुनक यांनी नियम मोडण्याची ही पहिली नव्हे तर दुसरी वेळ आहे.
कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. जून 2020 मध्ये डाउनिंग स्ट्रीट इथं तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित असताना कोव्हिडच्या नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.
त्यांच्यासोबत तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि जॉन्सन यांच्या पत्नी कॅरी यांच्यावरही नियम मोडल्याचे आरोप करण्यात आले होते.
ब्रिटनमध्ये कायदा मोडल्यास दंड आकारला जातो, ज्याला फिक्स्ड पेनाल्टी असं म्हणतात.
फिक्स पेनल्टी नोटीस आल्यानंतर 28 दिवसांच्या आत दंड भरावा लागतो, किंवा त्या विरोधात कोर्टात आव्हान द्यावं लागतं.
या प्रकरणी व्यक्ती कोर्टात गेल्यास पोलीस प्रकरणाचा आढावा घेतात आणि दंड मागे घ्यायचा की न्यायालयात लढा द्यायचा, हे ठरवतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
विरोधकांची टीका
सुनक यांना दंड ठोठावण्यात आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका सुरू आहे. लेबर पार्टीच्या डेप्युटी हेड अँजेला रेनर यांनी ट्विट करत म्हटलंय की, ऋषी सुनक हे सरकारची जबाबदारी बनलेत.
तेच दुसरीकडे लेबर पार्टीच्या प्रवक्त्याने म्हटलंय की, "ऋषी सुनक अर्थव्यवस्थेच्या विकासाबद्दल बोलण्याचं नाटक करत होते, पण प्रकरण त्यांच्यावरच उलटलं आणि त्यांचंच हसं झालं."
लिबरल डेमोक्रॅट्सने म्हटलंय की, पदावर असताना दंड भरणारे ऋषी सूनक दुसरे पंतप्रधान आहेत. बोरिस जॉन्सनप्रमाणेच त्यांनाही नियमांशी देणंघेणं नसल्याचं त्यांनी दाखवून दिलंय."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
लिबरल डेमोक्रॅट्सच्या नेत्या डेझी कूपर म्हणाल्या की, "पार्टीगेट पासून सीटबेल्ट गेटपर्यंत सर्वच कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यांना असं वाटतं की, ब्रिटिश नागरिक मूर्ख आहेत.
सामान्य लोकांसाठी एक आणि त्यांच्यासाठी एक असे वेगवेगळे नियम आहेत असं या नेत्यांना वाटतं. हा दंड कंझर्व्हेटिव्ह नेत्यांसाठी चपराक आहे."
मात्र दुसऱ्या बाजूला कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सूनक यांच्या बचावासाठी मैदानात उरलेत. ब्लॅकपूलचे नेते स्कॉट बेंटन म्हणाले, "प्रत्येकाकडून चुका होत असतात."
ते म्हणाले की, "पोलिसांनी समाजातील गंभीर गुन्हे रोखण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. हे प्रकरण वाढवायला नको. दरवर्षी हजारो लोकांवर अशी फिक्स्ड पेनल्टी लावली जाते."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
ब्रिटनमध्ये, 14 किंवा 14 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीने कार, व्हॅन आणि इतर वाहन चालवताना सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे. जर 14 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांनी सीट बेल्ट लावले नसतील तर यासाठी गाडीचा चालक जबाबदार असतो.
ज्या गाड्यांमध्ये सीट बेल्टची सुविधा नाहीये त्यांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आलंय. वैद्यकीय कारणास्तव (डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे)
पोलीस गाड्या, अग्निशमन दल किंवा बचावासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये सीट बेल्ट लावला नसल्यास दंड आकारला जात नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)