हुंड्यासाठी छळ, हत्येचा आरोप; वैष्णवी हगवणेचं बाळ कस्पटे परिवाराकडे परत आलं तेव्हा…

व्हीडिओ कॅप्शन, वैष्णवी हगवणेचं बाळ कस्पटे परिवाराकडे परत आलं तेव्हा…
हुंड्यासाठी छळ, हत्येचा आरोप; वैष्णवी हगवणेचं बाळ कस्पटे परिवाराकडे परत आलं तेव्हा…

राजेंद्र हगवणेंची सून वैष्णवी हिचा सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केला आणि त्यानंतर शारीरिक छळ करून संगनमताने तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी म्हणजे कस्पटे परिवाराने केला आहे.

सध्या या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंदेला अटक करण्यात आलीय.

पण वैष्णवी आणि शशांकचं बाळ हगवणेंच्या दुसऱ्या एका नातेवाईकाकडं देण्यात आलं होतं. हे बाळ सुखरूप घरी आल्यानंतर कस्पटेंच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं.