‘खोट्या प्रतिष्ठेपायी एखाद्याचा जीव घेणार हे किती योग्य आहे?’
‘खोट्या प्रतिष्ठेपायी एखाद्याचा जीव घेणार हे किती योग्य आहे?’
नांदेडमध्ये सक्षम ताटे आणि आचल मामीडवार या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. हे आंतरजातीय प्रेम प्रकरण होतं. याच कारणातून सक्षमची हत्या करण्यात आल्याचं समोर येतंय.
एक डिसेंबर रोजी सक्षमचा जन्मदिन होता. दोन-तीन दिवस आधीच म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी त्याची हत्या करण्यात आली. आचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं.
प्रेमविवाहात आणि खासकरून आंतरजातीय - आंतरधर्मीय नातेसंबंधांमध्ये तरुण तरुणींना कोणत्या अडचणी येतात?
अशा तरुण तरुणींसाठी काम करणाऱ्या राईट टू लव्ह या चळवळीचे के. अभिजीत यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला. त्यांनी याबाबत काय म्हटलं पाहा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






