'आमचे पप्पा गेले तसं कोणाचे पप्पा जाऊ नये'; अतिवृष्टीला कंटाळून बार्शीतल्या शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं
'आमचे पप्पा गेले तसं कोणाचे पप्पा जाऊ नये'; अतिवृष्टीला कंटाळून बार्शीतल्या शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं
आधीच कर्जबाजारीपणा आणि आता पावसाने घातलेलं थैमान… या गावात गेल्या 28 महिन्यात तब्बल 28 आत्महत्या झाल्या आहेत.
25 सप्टेंबर रोजी शरद गंभीर यांनी आत्महत्या केली. त्यांची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. 7 एकरवर त्यांनी फळबाग फुलवली. त्यासाठी कर्जदेखील काढलं होतं.
पण मुसळधार पावसाने सगळं वाहून नेलं. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगी-मुलगा आणि आई वडील आहेत.
रिपोर्ट - मुस्तान मिर्झा
निर्मिती - यश वाडेकर
एडिट - महेश सातपुते
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)