कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास सरकार मदत देणार? वाचा या योजनेची सर्व माहिती

कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास सरकार मदत देणार?

फोटो स्रोत, Getty Images

कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून कर्तेपण निभावणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. कुटुंबाचा गाडा चालवणं कठीण होतं. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कुटुंबाला सहाय्यकारी ठरेल अशी योजना तयार केली आहे.

केंद्र सरकारतर्फे अशा कुटुंबाला 20 हजार रुपयांची मदत केली जाते. 'नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम' असं या योजनेचं नाव आहे.

या योजनेअंतर्गत मदत मिळण्यासाठी काय निकष आहेत, काय कागदपत्रं सादर करावी लागतात, नक्की कोणत्या कुटुंबांना मदत केली जाते हे सगळं समजून घेऊया.

योजना काय आहे?

कुटुंब, मदत, सामाजिक कल्याण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सामाजिक कल्याण

कुटुंबातील प्रमुख कमावत्या माणसाचं अचानकच निधन झाल्यास केंद्र सरकारतर्फे 20,000 रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे ही योजना सुरु करण्यात आली आहे.

मृत्यू नैसर्गिक झाल्यास मदत मिळणार का?

कुटुंबातल्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू कसाही झाला तरी कुटुंबाला मदत मिळणार आहे.

प्रमुख कमावणारी व्यक्ती पुरुष असो की स्त्री- मदत पुरवली जाईल.

गृहिणीचा मृत्यू झाल्यास?

कुटुंब, मदत, सामाजिक कल्याण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महिला आणि गृहिणी यांचाही कुटुंबप्रमुख कमावते मध्ये समावेश करण्यात आला आहे.

गृहिणीचा मृत्यू झाला तरी तिला कमावणारी समजलं जाईल. त्या कुटुंबालाही मदत मिळेल.

ही योजना सगळ्या कुटुंबांना लागू होते का?

नाही. ही योजना फक्त गरीब कुटुंबांना लागू होईल.

ज्या कुटुंबाकडे पांढऱ्या रंगाचं रेशनकार्ड आहे, जे दारिद्रयरेषेच्या खाली आहेत त्या कुटुंबांना अशा स्वरुपाची मदत मिळेल.

मृत व्यक्तीचं वय किती असावं?

मृत व्यक्तीचं वय 18 ते 60 वयोगटादरम्यान असेल तर कुटुंबाला या योजनेअंतर्गत मदत मिळेल.

कुटुंबाची व्याख्या काय आहे?

नवराबायको, लहान मुलं, लग्न न झालेल्या मुली, आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले पालक या सगळ्यांचा कुटुंबात अंतर्भाव आहे.

योजनेअंतर्गत पैसे मिळण्यासाठी कोणते कागदपत्रं द्यावे लागतील?

कुटुंब, मदत, सामाजिक कल्याण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कागदपत्रांची पूर्तता
  • परिचयपत्र
  • वास्तव्याचा पुरावा
  • आधार लिंक बँक अकाऊंट डिटेल्स
  • मोबाईल नंबर
  • आधार कार्ड
  • कुटुंबप्रमुखाचा वयाचा पुरावा
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

मृत व्यक्तीसंदर्भातील कोणती कागदपत्रं द्यावी लागतील?

कुटुंब, मदत, सामाजिक कल्याण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आवश्यक कागदपत्रं
  • मृत्यूचा दाखला
  • परिचयपत्र किंवा आधार कार्ड
  • वास्तव्याचा दाखला
  • पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड

मदत कशी मिळेल?

कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबीयांच्या बँक खात्यात मदत रक्कम थेट जमा करण्यात येईल.

कोऑपरेटिव्ह बँकेत खातं असल्यास मदत मिळेल का?

खात्यात मदत रक्कम जमा होण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खातं असणं आवश्यक आहे.

कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे हे कळवण्याची जबाबदारी कुणाची?

ज्यांना या योजनेअंतर्गत मदत मिळवायची आहे त्याने यासंदर्भात संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाला संपर्क करावा.

कोण या योजनेसाठी लागू आहे?

  • अर्ज करणारा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खाली असणं अपेक्षित आहे.
  • अर्ज करणारा व्यक्ती मृत व्यक्तीचा वारसदार असावा.

आई-वडील दोघेही कमावते आहेत. आईचं उत्पन्न वडिलांपेक्षा जास्त आहे. आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. अशा कुटुंबाला मदत मिळेल का?

आईची नोंद कुटुंबप्रमुख अशी होऊन त्या कुटुंबाला मदत मिळेल.

लाभार्थीची निवड कशी केली जाते?

जिल्हाधिकारी आणि तालुका पातळीवर निवडसमितीची स्थापना केली जाईल. अर्जदाराने केलेल्या अर्जाची छाननी करण्यात येईल.

अर्ज विहित निकषांमध्ये बसत असेल तर संबंधित अर्जदाराला मदत मिळेल.

लाभार्थींची निवड ग्रामपंचायतीद्वारे केली जाईल.

अर्ज कुठे करावा?

योजनेअंतर्गत पैसे मिळावेत यासाठी जवळच्या सेवा केंद्रात तसंच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल.

अर्ज डाऊनलोड करावा. तो अर्ज भरुन जिल्हा सामाजिक कल्याण अधिकाऱ्याकडे द्यावा.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

अर्ज या लिंकवर उपलब्ध आहेत.

योजना तसंच अर्जासंदर्भात अधिक माहितीसाठी कोणाशी संपर्क करावा?

अधिक माहितीसाठी जवळच्या सामाजिक कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)