राहुल गांधींना जेव्हा लालू यादव लग्नाचा सल्ला देतात...
राहुल गांधींना जेव्हा लालू यादव लग्नाचा सल्ला देतात...
विरोधकांच्या बैठकीत राहुल गांधींच्या लग्नाचीही चर्चा झाली. पाटण्यात नितीश कुमार यांच्या निमंत्रणादाखल झालेल्या पत्रकार परिषदेत लालू यादवांनी राहुल गांधींना लग्नाचा आग्रह केला.
"तुमची आई म्हणते की तुम्ही ऐकत नाही, लग्न करा", असंही लालू यादव म्हणाले.
पाटणामध्ये नितीश कुमार यांनी निमंत्रित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत पुढील निवडणुका एकत्रितपणे लढण्याची घोषणा झाली.
पुढील बैठक शिमल्यात होईल ज्यात जागावाटप तसंच इतर गोष्टींबद्दल चर्चा केली जाईल.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



