मोदी सरकारची कोव्हिड काळातली इकॉनॉमिक टास्क फोर्स 'बेपत्ता'

व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदी सरकारने कोव्हिड काळात स्थापन केलेली इकॉनॉमिक टास्क फोर्स 'बेपत्ता'
मोदी सरकारची कोव्हिड काळातली इकॉनॉमिक टास्क फोर्स 'बेपत्ता'

चार वर्षांपूर्वी कोव्हिड 19च्या जागतिक साथीमुळे भारतामध्ये जगातला सर्वात कठोर लॉकडाऊन लावण्यात आला होता. सक्तीच्या या बंदीचा प्रचंड मोठा परिणाम झाला. आर्थिकदृष्ट्या बोलायचं झालं तर कामाच्या जागा आणि उद्योग अचानक बंद झाल्याने लक्षावधी रोजगार गेले.

देशाच्या विविध भागांमध्ये मोठं स्थलांतर सुरू झालं. त्या तिमाहीत भारताचा जीडीपी 23.9 टक्क्यांनी कमी झाला. पण या लॉकडाऊनमुळे आयुष्य वाचवण्यास मदत झाल्याचं सरकारने म्हटलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली होती.

सामान्य भारतीय, उद्योगपती आणि कंपन्यांवर झालेल्या आर्थिक परिणामांवर पावलं उचलण्यासाठी याचा फायदा होणार होता. पण पंतप्रधान मोदींच्या या टास्कफोर्सने कोणता रिपोर्ट सादर केला वा सूचना दिल्या किंवा एखादी बैठक घेतल्याचा कोणताही पुरावा बीबीसीला मिळालेला नाही.

बीबीसीच्या जुगल पुरोहित यांचा रिपोर्ट.