जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान आपल्या शेजारच्या देशातल्या होत्या
1960मध्ये सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या होत्या. कारण त्यांचे पती S.W.R.D भंडारनायके यांची हत्या झाली होती.
"वडिलांच्या हत्येनंतर राजकारणात येण्याचा माझ्या आईचा काहीच उद्देश नव्हता. कारण तिच्या 3 मुलांवरचं वडिलांचं छत्र हरवलं होतं. त्यांच्यासाठी तिला वेळ द्यायचा होता. पण पक्षाकडून आणि लोकांकडून खूप दबाव आला. शेवटी हे तिचं कर्तव्य आहे असं समजल्यावर ती तयार झाली," असं त्यांची मुलगी सुनेत्रा भंडारनायके यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधानांची काराकिर्द कशी होती? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)