शेतकरी ऊसाला पाणी देण्यासाठी रात्रपाळी का करत आहेत?
जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा पिंपळे येथे रात्री शेताला पाणी देण्यासाठी गेले असताना तीन सख्ख्या भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
औरंगाबादमध्येही बापलेकांचा शेताला पाणी देताना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. सध्या ग्रामीण भागात शेताला पाणी देण्यासाठी आठवड्यातले काही दिवस रात्री लाईट उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांचा धोका लक्षात ठेवून शेती भिजवावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातल्या वडगाव रासाई इथल्या तरुण शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना सध्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे हे जाणून घ्यायच बीबीसी मराठीने प्रयत्न केला.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - नितीन नगरकर
एडिटिंग - निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)