अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीची नाट्यमय घडामोड अशी होती

व्हीडिओ कॅप्शन, अजित पवारांच्या शपथविधीचं असं घडलं होतं नाट्य...

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे पहाटे केलेल्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. अजित पवार यांनी फडणवीसांसोबत ही शपथ घेतली तीही खरंतर उपमुख्यमंत्री म्हणूनच. त्यांनी याआधीही या पदावर काम केलं आहे आणि आताही ते उपमुख्यमंत्रिपदावरच आहेत.

त्यामुळे अजित पवारांनी गेल्या वर्षी दोनदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या वर्षी आजच्या दिवशी पहाटे घडलेला हा सगळा घटनाक्रम अत्यंत नाट्यमय होता.

त्यादिवशी म्हणजे 23 नोव्हेंबर 2019 ला शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या 'महाविकास आघाडी'चं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना शनिवारी सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)