युद्ध थांबलं: पण नागोर्नो काराबाखचं एक महत्त्वाचं शहर अझरबैजानच्या ताब्यात

व्हीडिओ कॅप्शन, रशियामुळे युद्ध तर थांबलं. पण, नागोर्नो काराबाखचं एक महत्त्वाचं शहर आझरबैजानच्या ताब्यात

रशियाने केलेल्या मध्यस्थीनंतर काल आझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात शांतता करार होऊन युद्ध थांबलं. वादग्रस्त नागोर्नो-काराबाख आणि आजूबाजूच्या परिसरात आता रशियन शांती सैन्य तैनात असेल. दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. यातले बरेचसे आर्मेनियन वंशाचे लोक होते. तर काही लाख लोकांना विस्थापितही व्हावं लागलं. ऐतिहासिक दृष्ट्या हा भाग आझरबैजानच्या ताब्यात आहे. पण, १९९४पासून आर्मेनियन वंशाच्या लोकांचं त्यावर राज्य आहे. ताज्या शांतता करारानुसार, आझरबैजानकडे या वादग्रस्त भागातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या शहराचा ताबा आला आहे. त्यामुळे तिथे जल्लोषाचं वातावरण आहे. तर आर्मेनियात संताप व्यक्त होतोय. बीबीसीचा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)