कोरोना काळात जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्यांना बनवलं पाणीपुरीचं ATM

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना काळात जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्यांना बनवलं पाणीपुरीचं ATM

कोरोनाच्या विळख्यात अवघे जग सापडल्यानंतर खवय्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे.

विशेष करून रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या सेवना बाबत मोठ्याप्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र यावर आता औरंगाबादेतील दोन इंजिनिअर तरुणांनी नवीन शक्कल लढवली आहे.

समीर पितळे आणि प्रतीक पितळे या दोन इंजिनिअर भावांनी चक्क पाणीपुरी एटीएम तयार केले आहे.

सेन्सर युक्त असलेल्या या पाणीपुरी एटीएम मुळे कुठलाही हस्तक्षेप न करता मशीन द्वारे पाणीपुरीचा आस्वाद औरंगाबादकरांना घेता येतोय.

व्हीडिओ - अमेय पाठक

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)