महाराष्ट्रातील शेतकरी कृषी विधेयकावर शांत का? सोपीगोष्ट 170

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रातील शेतकरी कृषि विधेयकावर शांत का?

कृषी सुधारणांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली आहेत. आवाजी मतदानानं ही विधेयकं मंजूर करण्यात आली.

यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. ही विधेयकं मंजूर झाली. पण काही राज्यांमध्ये त्या विरोधात परिस्थिती पेटली आहे. पंजाब, हरयाणा आणि दक्षिणेत आंध्रप्रदेशमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेती धनदांडग्यांच्या हातात दिल्याचा आरोप हे शेतकरी सरकारवर करतात. पण, त्याचवेळी महाराष्ट्रातला शेतकरी मात्र शांत आहे. असं का? मराठी शेतकरी विधेयकावर खूश आहेत का?

पाहा आजची सोपी गोष्ट

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)