वर्धा जिल्ह्यातलं दत्तपूर बनतंय 'गांधीजींच्या स्वप्नातलं' आत्मनिर्भर गाव

व्हीडिओ कॅप्शन, वर्धा जिल्ह्यातलं दत्तपूर बनतंय 'गांधीजींच्या स्वप्नातलं' आत्मनिर्भर गाव

वर्धा जिल्ह्यातील दत्तपूरच्या ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात काही उपक्रम सुरू आहेत, जे ग्रामीण भागातील लोकांचं आयुष्य सोपं करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हागणदारीमुक्त महाराष्ट्रासाठी या इको-व्हिलेजने जवळपास 1 लाख शौचालयं उभारली आहेत. याशिवाय कृषी निगडित कामं तसंच ग्रामोद्योगात हे केंद्र लोकांना प्रशिक्षित करत आहे. तसंच सिमेंट-काँक्रीट नव्हे तर मातीच्या विटांपासून अधिक किफायतशीर घरं या केंद्रातर्फे बांधली जातात.

तंत्रज्ञान विकसित करून हस्तांतरित करणं, या तत्त्वावर हे विज्ञान केंद्र काम करतं. त्यामुळे सरकारी अनुदानावर चालणाऱ्या या संस्थेचा ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगला लाभ होतोय.

दत्तपूर, वर्ध्याहून नितेश राऊत यांचा रिपोर्ट

एडिटिंग – राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)