कोरोना: केईएम हॉस्पिटलच्या कोव्हिड वार्डला जेव्हा आम्ही भेट दिली...
कोरोना काळातल्या अनेक बातम्या येताहेत. काळ कमालीच्या कसोटीचा आहे. पण 'केईएम'च्या ज्या कोव्हिड वॉर्डमध्ये, तिथल्या आयसीयूमध्ये या विषाणूसोबत शेवटची लढाई लढली जाते, त्या वॉर्डमध्ये परिस्थिती कशी आहे याची बाहेर बहुतांशी कल्पना नाही.
या कोव्हिड आयसीयूमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची स्वतंत्र कहाणी आहे. बाहेरुन केवळ आकड्यांकडे लक्ष ठेवणाऱ्यांना कदाचित तो समजत नसावा किंवा आपलं लक्ष जात नसावं.
हे सगळे डॉक्टर्स आणि सपोर्ट स्टाफ जीवावर उदार होऊन इथं काम करताहेत. ते करतांना त्यांच्या पदरी जे येतं आहे ते तक्रार न करता स्वीकारताहेत आणि मग पुन्हा काम सुरु करताहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)