कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं? -सोपीगोष्ट 79

कोरोना व्हायरसची साथ घेऊनच 2020 उजाडलं. गेल्या पाच महिन्यांमध्ये असा एकही दिवस नव्हता की आपण कोव्हिड-19 या रोगाविषयी बोललो नाही आहोत. पण हा रोग काही संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. ज्या चीन आणि कोरियाने ही साथ आटोक्यात आणल्याचं जाहीर केलं होतं, त्यांनी आता पुन्हा साथीची दुसरी लाट येत असल्याचे संकेत दिले आहेत.

त्यातच 13 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठं वक्तव्य केलं – की कदाचित हा विषाणू कधीच संपणार नाही.

ही बातमी ऐकून प्रत्येकालाच जरा धडकी भरली. कोरोनाचं संकट कधीच संपणार नाही, तर आपण जगायचं कसं? हे लॉकडाऊन असंच राहणार का? आपलं आयुष्य कधीच नॉर्मल होणार नाही का?

संशोधन – गुलशनकुमार वनकर

निवेदन – विनायक गायकवाड

एडिटिंग – शरद बढे

हे वाचलंत का?