'मी विकलांग आहे, पण रिक्षा चालवून समाजात ताठ मानेने जगतेय' - पाहा व्हीडिओ
अंकिता शाह गुजरातमधल्या पलिटनामध्ये राहातात. त्यांचे दोन्ही पाय पोलियोमुळे अधू झाले आहेत.
पण आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवण्यासाठी त्या गेल्या वर्षभरापासून रिक्षा चालवतात.
"मी प्रवाशांना हाका मारते तेव्हा लोक माझ्याकडे आश्चर्याने बघतात. विकलांग महिला असून रिक्षा चालवतेय असा भाव त्यांच्या नजरेत असतो. मी अर्ज केले तेव्हा माझ्या विकलांगतेमुळे लोक मला नोकरी द्यायला नाही म्हणायचे. तो त्यांचा संकुचितपणा होता. आता मी माझ्या सोयीप्रमाणे काम करते. मी पूर्वीपेक्षा आता जास्त पैसे कमवते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)