हवामान बदल: ग्रेटा थुनबर्गसोबतच 11 वर्षांच्या रिधिमाने ठोठावला UNचा दरवाजा - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, हवामान बदलावर अकरा वर्षाच्या रिधिमाने ठोठावला युएनचा दरवाजा

हवामान बदलाबद्दल आता ठोस पावलं उचलण्याची वेळ आलीये, असं सांगणारी ग्रेटा थनबर्ग ही सध्या चर्चेत आहे.

ग्रेटाप्रमाणेच अनेक तरुणांना आपल्या पर्यावरणाची चिंता वाटतीये. त्यांपैकी एक आहे भारताची रिधिमा पांडे.

न्यूयॉर्कमध्ये हवामान बदलावरील परिषद पार पडली. या परिषदेत सहभागी होण्याची संधी 11 वर्षांच्या रिधिमाला मिळाली.

यापूर्वी रिधिमानं 2017 साली भारत सरकारविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका नंतर फेटाळली गेली. पण रिधिमा पर्यावरणासाठीचं आपलं काम करतच आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)