जपान: व्हेल माशांची शिकार पुन्हा सुरू - पाहा व्हीडिओ
जपानने व्हेल माशांची शिकार करण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. पॅसिफिक समुद्रकिनाऱ्याजवळ वाडा भागात ही शिकार पाहण्यासाठी लोक जमा झाले होते. शिकार करण्यात आलेला हा मासा 6 टन वजनाचा आहे.
1960 मध्ये जपानमध्ये 20 हजार व्हेल माशांची शिकार करण्यात आली होती. पण यावर्षी फक्त 227 व्हेलची शिकार करण्याची परवानगी सरकारने दिली आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)